चित्रा वाघ यांनी नवेगाव बांध परिसराला भेट दिली.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गोंदियाहून गडचिरोलीला जाताना, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांच्यासोबत नवेगाव बांध परिसरास भेट दिली.

Update: 2024-02-13 12:51 GMT

भारतीय जनता पक्ष महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गोंदियाहून गडचिरोलीला जाताना, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांच्यासोबत नवेगाव बांध परिसरास भेट दिली. नागझिरा अभयारण्याचा भाग असलेला हा परिसर निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे.

या जंगलात वाघ, बिबट्या आणि इतर अनेक वन्यजीव आढळतात. शिवाय, मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षीही येथे येतात. येथील मालगुजारी तलाव पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

मालगुजारी तलावातील पाणी ओंजळीत घेऊन चित्रा वाघ यांनी तलावास प्रणाम केला. मालगुजारी तलाव निसर्गरम्य वातावरण आणि विविध वनस्पती आणि प्राणी यामुळे नवेगाव बांध पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सध्या, पर्यटन वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याच चित्रा वाघ यांनी त्यांच्या X पोस्टद्वारे संगितल आहे.

नवेगाव बांध परिसर भेटीदरम्यान, चित्रा वाघ यांनी एका झाडाला बांधलेल्या झोक्यावर हिंदोळे घेत झोक्याचाही आनंद घेतला. यामुळे त्यांच्या प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

जीवनसमृद्धीसाठी निसर्गसमृद्धी किती गरजेची आहे, हे इथे आल्यावर जास्त जाणवते असे ही भारतीय जनता पक्ष महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आपल्या X पोस्ट मध्ये म्हणाल्या आहेत.

Tags:    

Similar News