गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार कायम, सुनावणी पुढे ढकलली

Update: 2022-04-22 04:42 GMT

भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते तसेत आमदार नेते गणेश नाईक यांच्या बलात्कार आणि बंदूक दाखवून धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून काही दिवसातच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. गुरूवारी बंदूक दाखवून धमकावल्या प्रकरणी आज ठाण्याच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली व बलात्काराप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. गणेश नाईक आणि फिर्यादी 1993 पासून एकत्र रहात होते व त्यांचे संबंध होते ज्यातून त्यांना 2004 मध्ये एक मुलगा देखील झाला असा आरोप केला गेला होता.

परंतु आता दोन वर्षांपासून आपण राजकीय पक्ष बदलून भाजप मध्ये प्रवेश घेतल्यानेच आपल्यावर आरोप होत असल्याची तक्रार नाईक यांच्या वकिलांनी केली. बंदूक दाखवणे हा फार मोठा गुन्हा असून यावर्षी अंतरीम जामीन मिळू नये अशी मागणी फिर्यादी वकिलांनी केली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी तपास अधिकारीच ऐकणार असून मगच अटकपूर्व जमिनावर सुनवाई २७ एप्रिलला करणार असल्याची माहिती फिर्यादी वकिलांनी दिली. या सर्व प्रकारामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांच्या डोकेदुखीत वाढच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

गणेश नाईक अज्ञातवासात?

धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं प्रकरण सध्या गाजत असतानाच गणेश नाईक यांचे प्रकरण आता समोर आलं आहे. दिपा चौहान या महिलेने गणेश नाईकांनी पिस्तूल दाखवून धमकी दिली तसेच बलात्कार केला म्हणून त्यांच्यावर बेलापूर आणि नेरूळ येथील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नाईकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्या महिलेने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर महिला आयोगाने नाईक यांच्या अटकेचे आदेश दिले. पोलीस गणेश नाईक यांच्या घरी, कार्यालयात आणि मुरबाड येथील फार्महाऊसवर अटकेसाठी पोहोचले पण गणेश नाईक कुठेच नाही आहेत. ते सध्या अज्ञातवासात आहेत.

Tags:    

Similar News