आपण कोणाविषयी बोलतोय याचं रुपाली चाकणकरांनी भान ठेवावे: उमा खापरे

राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?

Update: 2021-08-17 12:33 GMT

राज्यातील विधानपरिषद 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देत, 'चंद्रकांत दादा आपलं जितकं वय आहे तितकं पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे' असं म्हंटलं होतं. त्यांच्या या टीकेला आता भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी उत्तर दिले आहे. 'आपण कोणाविषयी बोलतोय याचं रुपाली चाकणकरांनी भान ठेवावे"असा खोचक टोला खापरे यांनी लगावला आहे.

खापरे यांनी म्हंटले आहे की, रुपाली ताई आपला अनुभव किती,आपली राजकीय कारकीर्द काय?,आपण कोणाविषयी बोलतोय, याचं थोड भान असू द्या, शरद पवार असतील,चंद्रकांत पाटील किंवा अमित शहा असतील,यांच्या विषयी बोलणेएवढा आपला अनुभव नाही.त्यामुळे आपण भान ठेवावे की आपण कोणाविषयी बोलतोय. त्यामुळे आपली राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या? , असा टोलाही खापरे यांनी लगावला आहे.

राज्यपाल हे काही भाजपचे पदाधिकारी नाहीत तेंव्हा चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांच्या मदतीला धावावं. राज्यात भाजपची सत्ता आली नसल्याने ते या ना त्या कारणाने राज्याला अडसर ठरेल अशी कृती करत असल्याचे चाकणकर यांनी म्हंटल होतं. त्यांच्या या टीकेला आता भाजपने सुद्धा उत्तर दिले आहे.

Tags:    

Similar News