"मी कोणत्याही चौकशीसाठी तयार", चित्रा वाघ यांची पिडीतेच्या आरोपांनंतर प्रतिक्रीया

Update: 2022-04-12 11:22 GMT

राज्यभरात गाजत असलेलं रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पिडीतेने, "रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला मला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं त्यासाठी त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी देखील दिली असे खळबळजनक आरोप साम टीव्ही न्युजशी बोलताना केले. यानंतर आता चित्रा वाघ यांनी व्हिडीओ बनवत, "मी कोणत्याही चौकशीला सामोरी जाण्यास तयार आहे", अशी प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात

Feb पासून एकटी लढणार्या या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात तिने बोलताचं सगळे एकत्र तिच्या मदतीसाठी आलेत याचा आनंद वाटला..

मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे…

मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचंय काही अडचण असेल संपर्क करा जी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्की करू व करत राहू ….

पिडीतेने नेमके काय आरोप केले?

"मला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं गेलं होतं. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं होतं. याशिवाय मी जर कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू", अशी धमकी दिल्याचे आरोप पिडीतेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर लावले आहेत.

याशिवाय महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणेचा वापर करून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज केले गेले आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.

राजकीय हव्यासापोटी पिडातेचा वापर…

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी, "काही व्यक्ति स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने दिवसभर टाहो फोडतात. पण स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी एका मुलीचे आयुष्य बरबाद केले आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत. आज पीडितेनेच खळबळजनक वक्तव्य करून खुलासा केला आहे. पीडित मुलीला भेटून यामध्ये काय धागेदोरे आहेत? हे नक्की काय प्रकरण आहे? याची संपूर्ण माहिती घेऊन जर कोणी आशा पद्धतीने एका व्यक्तीला बदनाम करत असेल किंवा एखाद्या तरूणीचे आयुष्य बरबाद करत असेल तर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील असं म्हंटल आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Tags:    

Similar News