अमित ठाकरेंना मंत्रिपदाची चर्चा..

Update: 2022-07-14 05:31 GMT

राज्याच्या राजकारणात मागच्या अनेक दिवसात खूप काही अनपेक्षित घटना घडत आहेत. अशा काही घटना घडल्या कि अनेकांना याचा धक्का बसला. याची सुरवात झाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडापासून त्यानंतर मग त्यांच्यासोबत गेलेले ४० हुन अधिक आमदार असतील तिथून मग उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि त्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी अशा काही राजकीय घटना महाराष्ट्रात घडल्या ज्याची चर्चा देशभर झाली. आता अजून देखील हे राजकीय नाट्य संपलेले नाही. कधी काय होईल याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही आहे. यात आता पुन्हा एक चर्चा सुरु झाली आहे ती भाजपने मनसेला दिलेल्या ऑफरची. आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे कि, मणसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपदाची ऑफर भाजपने दिली आहे. मात्र हि फक्त चर्चाच आहे याबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने स्पष्टता दिलेली नाही.

अमित ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. तरीही त्यांना आता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश करणार असल्याची ऑफर भाजपने दिली असल्याची चर्चा आहे. मागच्या सरकार मध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील मंत्री होते. अगदी कमी वयात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती आता नवीन सरकार मध्ये अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करणार असल्याचं देखील म्हंटले जात आहे. आता यातील नक्की सत्यता काय आहे हे येणाऱ्या काळात स्पस्ट होईल..

Tags:    

Similar News