घरगुरी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ..

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज 50 रुपयांनी वाढ झाली असून आता गॅस सिलेंडरची नवीन किंमत 999.50 रुपये झाली आहे.

Update: 2022-05-07 04:37 GMT

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाल्याच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. ही सगळी महागाई सर्वसामान्य नागरिक सहन करत असताना आता महागाईचा आणखीन एक धक्का बसला आहे. घरगुती गॅसच्या किमतीत आता 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत 50 रुपयांनी वाढवल्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत आता हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

घरगुती गॅसच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. यापूर्वी 1 मे रोजी व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. आता त्यानंतर घरगुती सिलेंडर गॅसच्या किमतीत सुधा 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर आता गॅस सिलेंडरची नवीन किंमत 999.50 रुपये झाली आहे. मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर त्यांची किंमत 2,355 रुपयांवर गेली आहे.

Tags:    

Similar News