12 वर्षांनंतर आई, बाबांसोबत नववर्षाचे स्वागत; मुंबई पोलिसांनी केलं कौतुक

Update: 2021-12-31 08:13 GMT

दरवर्षी सर्वत्र नववर्षाचे स्वागत जोरदार केले जाते. पण मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सगळ्याच उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. आता मध्यंतरी कोरोनाच्या केसेस कमी होताना पाहायला मिळत होत्या पण सध्या कोरोना व नवीन आलेला ओमिक्रॉन व्हेरीयंट पुन्हा एकदा तोंड वर काढतोय. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. या सगळ्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

ही परिस्थिती पाहता राज्यात नववर्षाच्या स्वागत उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या पर्शवभूमीवर आकाश भारद्वाज यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, '12 वर्षांनंतर आई आणि बाबांसोबत नववर्षाच्या स्वागताची पार्टी घरी करता येणार आहे. या पुर्वी मी कधीही घरी नवीन वर्ष्याच्या स्वागताची पार्टी केली नव्हती याची मला आज महामारीमुळे जाणीव झाली.'

आई वडिलांसोबत नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्याच्या आकाश यांच्या निर्णयाचे मुंबई पोलिसांनी स्वागत केले आहे. , 'विशेष दिवशी आपल्या कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळणे किती मौल्यवान आहे हे आम्हाला निश्चित समजते, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतचा फोटो आम्हाला पाठव' असं रिट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

या सोबत मुंबई पोलिसांनी आणखीन एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आज रात्री बाहेर जाऊन पार्टी करणार्यांना एक चांगला सल्ला देखील दिला आहे. त्यांनी ट्विट करत, 'आज सर्वांनी बेजबाबदार पार्टीचे नियोजन टाळायचे.. असं म्हणत एक ग्राफिक्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये दोन व्यक्तींमधील संभाषण आहे. 'ज्यात एक व्यति दुसऱ्या व्यक्तीला विचारतो Bro, aaj ka kya scene? Where to celebrate New year!? या त्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून दुसरा व्यक्ती त्याला एका बातमीची लिंक पाठवतो ज्यामध्ये तो वाढत्या कोरोनाच्या प्रदूर्भावामुळे लोकांनी गर्दी करू नये यासाठी मुंबई मध्ये 144 कलम लागू केलं असल्याची माहिती त्याला देतो. त्यानंतर तो दुसरा व्यति देखील हे मान्य करतो..असं हे दोघांमधील संभाषण मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे. त्यामुळे तुम्ही देखील असे काही प्लॅन्स आज बनावत असाल तर ते लगेच रद्द करून टाका..

राज्यात सध्या नववर्षाच्या स्वागत समारंभावर शासनाने बंदी घातली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेऊन 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण शहरात कलम 144 लागू केले आहे. आता एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी असणार आहे. यासोबतच शहरातील सर्व हॉटेल, बार, क्लब, पब आणि रेस्टॉरंटमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आणि सेलिब्रेशनवरही बंदी घालण्यात आली आहे.

Tags:    

Similar News