भाजपा कार्यालयातच महिलेवर अत्याचाराच प्रयत्न; चित्रा वाघ याचं मौन

Update: 2021-09-23 08:10 GMT

मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे नेहमी महिला अत्याचाराच्या घटनावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावर मौन राहणे पसंद केल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. तर धाय मोकलुन रडणा-या भाजपच्या ताई आज कुठेय?,असा प्रश्न शिवसनेकडून विचारला जात आहे.

राज्यातील कुठेही महिला अत्याचाराची घटना समोर आल्यावर महिलांच्या न्याय-हक्कासाठी चित्रा वाघ धावून येतात. तर त्यांच्या आक्रमक भुमिकेमुळे अनेक महिलांना न्याय मिळाला आहे. मात्र आज त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात आणि तेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर चित्रा वाघ यांनी पक्ष बाजूला ठेवून पिडीत महिलेसाठी आवाज उठवणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत यावर त्यांची कोणतेही प्रतिक्रीया आलेली नाही.

काय आहे प्रकरण!

पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Tags:    

Similar News