पी. टी. उषा होणार खासदार..

Update: 2022-07-07 07:06 GMT

जगभरात सुप्रसिध्द भारताची वेगवान धावपटू ऑलंपिकमध्ये सातत्याने विक्रम करणारी केरळच्या ख्यातनाम अॅथलिटी पी. टी. उषा यांची राज्यसभेवर नामनियुक्ती सदस्य म्हणून नियूक्ती करण्यात आली. क्रिडा विभागातून करण्यात आलेली पहिलीच महिला खासदार होणार आहे. ही बातमी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करूण दिली आहे. त्यांनी Twit करत म्हंटलं आहे की, पी.टी. उषा जी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ज्ञात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्यही तितकेच कौतुकास्पद आहे.

या सोबतच अजून तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये संगीतकार इलयराजा, कर्नाटक धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, पटकथाकार के.व्ही.विजेंद्र प्रसाद या चार नामवंताची मोदी सरकार ने राज्यसभेवर नामनियुक्ती सदस्य म्हणून नियुक्ती केली.

Tags:    

Similar News