Corona मुळे लोकांकडे पैसे नाहीत असं म्हणताय...तरीही सोनं खरेदीत काल 25 टक्क्यांनी वाढ

Update: 2021-10-16 02:43 GMT

दसऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. कारण दसऱ्याचा दिवस खूप पवित्र मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेक लोक सोनं, घर, वाहन यासारख्या अनेक गोष्टींची खरेदी करत असतात. मात्र सध्या देशावर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाला आहे. त्यामुळे यंदा बाजारात दरवर्षीप्रमाणे उलाढाल होईल का? याबाबत सर्वांना शंका होती. Corona मुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचे व्यवसाय बंद झाले, अनेक लोक सध्या आर्थिक संकटात आहेत. मात्र असं जरी असलं तरी काल दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोनं खरेदी मध्ये साधारण 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर राज्यात काल दिवसभरात 163 घरांच्या दस्ताची नोंदणी झाली आहे.


Full View

कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असताना, अनेक लोक आर्थिक विवंचनेत असताना देखील सोनं खरेदी मध्ये 25 टक्‍क्‍याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा बाजार भाव पाहिला तर सोनं प्रतितोळा 47 हजार 70 रुपयांवर पोचले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत Gold स्वस्त आहे. मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी सोनं 50 हजार 500 रुपये प्रति तोळा इतकं होतं. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून सोन्याची मागणी वाढली होती. सध्या सोन्याचे भाव हे घसरलेले आहेत. मात्र सोने चांदी बाजारातून असा अंदाज लावला जात होता की, दसऱ्याला सोन्याचे भाव वाढतील. मात्र जर आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पाहिलं तर सोन्याच्या भावात प्रतितोळा 1 हजार 170 रुपयांची वाढ झाली आहे.


Tags:    

Similar News