का होतोय ट्विटर वर #ArrestLucknowGirl ट्रेंड ? वाचा सविस्तर

लखनऊच्या कृष्णानगर येथील अवध चौकात एका युवतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ट्विटर वर #ArrestLucknowGirl ट्रेंड होत आहे.

Update: 2021-08-02 11:12 GMT

लखनऊच्या कृष्णानगर येथील अवध चौकात एका युवतीचा हाईवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. या युवतीने एका कॅब चालकाला मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. सोबतच तीने संबधित कॅब चालकाचा मोबाईल देखील फोडला होता. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारादरम्यान या युवतीने कॅब चालकाला मारहाण करण्याचा धडाकाच लावला होता. दरम्यान संबधित युवतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्विटर वर #ArrestLucknowGirl ट्रेंड होत आहे.

Megh Updates नावाच्या एका हैंडलवर सर्वात आधी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता आणि त्याखाली कॅप्शन लिहीण्यात आले होते की, 'व्हायरल व्हिडीओ : अवध चौक, लखनऊ, यूपी येथे एक युवती एका कॅब चालकाला मारहाण करत आहे आणि त्याचा फोन तोडून टाकत आहे.'

कॅब चालकाला वाचवण्यासाठी एक व्यक्ती मध्यस्ती करू लागला तर या युवतीने त्याला देखील मारहाण केली. दरम्यान कॅब चालकाला का मारहाण करत आहेस? असं या युवतीला विचारले असता तीने उत्तर दिले की, या कॅब चालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिली. दरम्यान या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, संबधित युवती त्या कॅब चालकाला फरपटत आहे आणि त्याच्या कानशीलात लावत आहे. संबधित कॅब चालकाना काहींनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, ही युवती आरडा-ओरड करत त्या कॅब चालकाला मारहाण करतच राहीली. दरम्यान एका वाहतुक पोलिसाने या युवकाला सोडवण्या ऐवजी त्या दोघांनाही रस्त्याच्या बाजूला केले. संबधित युवती पोलिसांसमोरच कॅब चालकाला मारहाण करत होती. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सध्या #ArrestLucknowGirl हा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे.

Tags:    

Similar News