अमृता फडणवीस यांची उखाण्यातून विरोधकांवर टोलेबाजी

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मंडळात आयोजित "विकासाचे वान, हळदी कुंकू" या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला आहे.

Update: 2024-02-06 13:38 GMT

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मंडळात आयोजित "विकासाचे वान, हळदी कुंकू" या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या आग्रहावर एक गाणे गायले आणि एक उखाणाही सादर केला असून त्या म्हणतात "देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण, आणि मी घेऊन आली विकासाचे वान. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण". या उखाण्याद्वारे अमृता फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.

या उखान्यातून असं समजत की देवेंद्र फडणवीस यांनी नाकर्तेपणाच्या राजकारणावर बाण सोडला आहे असून, आता विकासाचे वान महाराष्ट्रात आले आहे. भारत सरकारकडून विषेशता महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामुळे महिलांना समाजात सन्मानाने उभे राहण्याची संधी मिळत आहे, असून आता सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करायला हवा. असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.


"अलग मेरा ये रंग हैं, मेरी खूद से ही जंग हैं, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग हैं", महिलांच्या आग्रहावरुण अमृता फडणवीस यांनी हे सुंदर त्यांच्याच आवाजातल गाण गायल आणि महिलांमध्ये एक उत्साह निर्माण केला.

या कार्यक्रमात अनेक महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी अमृता फडणवीस यांच्या भाषणाचा, गायनाचा आणी उखाण्याचा उत्साहाने स्वीकार केला. 

Tags:    

Similar News