नांदूर गावाची आम्रपाली पगारेची 'इंडियन आयडॉल'च्या अंतिम निवड फेरीत धडक

Update: 2021-10-21 01:38 GMT

 येवल्याच्या नांदूर या छोट्याशा गावात राहणारी आम्रपाली पगारे हिने 'इंडियन आयडॉल' च्या अंतिम निवड फेरीत धडक मारली आहे. गायनाची कोणतीही कुठली पार्श्वभूमी नसलेल्या आणि गायनाचे शिक्षण घेतलेले नसताना आम्रपालीने अंतिम निवड फेरीत धडक मारल्याने तिचे कौतुक होत आहे.

जरी आम्रपालीने गाण्याचे शिक्षण घेतले नसले तरी तिचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. सोनी मराठी टीव्हीवरील 'इंडियन आयडॉल' कार्यक्रमाच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी आम्रपाली सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकते.

आम्रपालीला तिचे वडील गौतम पगारे यांनी कुटुंबियांनी गाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान यावेळी बोलताना आम्रपालीची आई गयाबाई पगारे म्हणाल्या की, आम्रपालीला इयत्ता तिसरीत असल्यापासून गाण्याची आवड आहे, शाळेतील विविध स्पर्धेत ती भाग घेत होती, माझ्या वडिलांना देखील गाण्याची आवड होती त्यांच्यामुळे मला गाण्याची आवड निर्माण झाली जेंव्हा आम्रपाली एखाद्या गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायची तेंव्हा मला शक्य होईल तसं मी तिला सहकार्य करायचे आज तिने हा टप्पा पार केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की, तिची इंडियन आयडॉल मध्ये नक्की निवड होईल.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्रपालीने गाण्याची आवड जोपासली आहे तिची 'इंडियन आयडॉल'मध्ये निवड व्हावी यासाठी तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:    

Similar News