बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात राज्यातील महिला एकवटल्या

Update: 2022-02-04 05:30 GMT

गुरुवारी वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीचे निर्णयाविरोधात साताऱ्यात आंदोलन केलं होतं या आंदोलनादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच भाजप व त्याच्या पंकजा मुंडे या दारू पितात असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यातील सर्वपक्षीय महिला नेतृत्व एक वाटला आहे

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईट विक्रीला परवानगी दिली होती सरकारच्या या निर्णयाविरोधात साताऱ्यामध्ये आंदोलन करत असताना पत्रकारांशी बोलताना बंडा तात्या कराडकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी निषेध नोंदवत सातारा पोलिसांना बंडातात्याच्या अटकेचे आदेश दिले आहेत. तसेच बंडातात्यानी 48 तासात केलेल्या वक्तव्याबद्दल लेखी खुलासा महिला आयोगाकडे करावा असं देखील सांगितलं आहे.

भाजप कार्यकर्त्या संगीता धसे यांनी देखील बंडातात्यावर टीका करत तोंडाला काळ फासण्याची धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत,"बंडा तात्यानी जर उघडपणे माफी मागितली नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय बीड जिल्हा भाजप नेतृत्व शांत बसणार नाही"

याशिवाय राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी बंडातात्याच बंडलबाज तात्या असं नामकरण करत टीका केली. शिवाय कोणतंही कारण असो स्त्रीला बदनाम करणं हीच अशा लोकांची प्रवृत्ती आहे असंही त्या म्हणाल्या.

याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्याच रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडा तात्याला नोटीस पाठवून त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या सगळ्या प्रकारानंतर राज्य महिला आयोगाच्या आदेशानुसार सातारा पोलिसांनी बंडा तात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags:    

Similar News