बाबो.., WhatsApp आपल्यासाठी काय घेऊन येतंय पहा...

Update: 2023-08-17 07:01 GMT

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये, लवकरच वापरकर्त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे स्टिकर्स तयार तर करता येणार आहेतच पण त्या शिवाय ते इतरांना शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे. वाह.. याबद्दलची जितकी उत्सुकता तुम्हाला लागली आहे तितकीच आम्हाला देखील लागले आहे. व्हाट्सअप मध्ये येणारं हे नवीन फिचर नक्की काय आहे? याचा वापर करून नक्की कशा प्रकारे करता येईल? हे फीचर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर तयार करेल? हेच सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत... 

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी एक नवीन फीचर आणण्यासाठी काम करत आहे, जे बीटा व्हर्जन 2.23.17.14 च्या डेव्हलपमेंट टप्प्यात आहे. आता हे व्हर्जन 2.23.17.14 काय म्हणून जास्त लोड घेऊ नका तर हे फिचर बनवण्यासाठी काम सुरु आहे इतकंच आपण लक्ष्यात घेऊ.. तर लवकरच कंपनी हे फीचर सर्वांसाठी रोलआउट करणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर यूजर्सला स्टिकर टॅबमध्ये मिळेल. WABetaInfo ने फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो AI स्टिकर्ससाठी 'Create' बटण नवीन दाखवत आहे..

अलीकडेच व्हॉट्सअॅपने तीन नवीन फीचर्स आणले आहेत...

अलीकडेच व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलसाठी तीन नवीन फीचर आणले आहेत. यामध्ये स्क्रीन शेअरिंग आणि लँडस्केप मोड आणि व्हिडिओ मेसेजिंग फीचरचा समावेश आहे. यासोबतच व्हॉट्सअॅप वापरकर्ते व्हिडिओ मेसेज फीचरद्वारे छोटे व्हिडिओ मेसेज पाठवू शकतात. या फीचरद्वारे यूजर्स 60 सेकंदांपर्यंतचे रिअल टाइम व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकतात. हे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड देखील असतील असा कंपनीचा दावा आहे. त्यानंतर आता व्हाट्सअपच्या ज्या नवीन फिशरची चर्चा सुरू झाली आहे. व्हाट्सअप लाँच करत असलेल्या नवीन फीचर बद्दल तुम्हाला काय वाटतं त्याची उपयुक्तता किती आहे? आहे की नाही? हे बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, त्या सोबत हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद...

Tags:    

Similar News