नवाज शरीफ यांच्या कार्यालयावर हल्ला; इम्रान खान यांच्यावर संशयाचे बोट..

Update: 2022-04-04 09:56 GMT

नवाज शरीफ यांच्या कार्यालयावर हल्ल्यानंतर त्यांची मुलगी मरियमने इम्रानवर खानवर आरोप केले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे संस्थापक नवाझ शरीफ यांच्या ब्रिटनमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत 20 हून अधिक हल्लेखोरांचा समावेश होता. आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला होता, त्याआधी रविवारीही एका व्यक्तीने त्याच्यावर मोबाईल फेकून त्याचा अंगरक्षक जखमी केला होता.

मारहाणप्रकरणी ४ आरोपींना अटक

नवाज शरीफ यांच्या लंडन कार्यालयाबाहेर मारहाण होतं असलेले व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या व्हिडिओ मध्ये काही लोकांना मारहाण होत आहे. ज्या वाहनातून हल्लेखोर आले होते त्या वाहनांवर इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे झेंडे होते. या हल्ल्यात नवाज शरीफ यांचे 2 कर्मचारी व 3 हल्लेखोर गंभीर जखमी झाले आहेत.

काही व्हिडिओ मध्ये हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे सर्वजण 'किल-किल' म्हणत आहेत. एका व्हिडिओमध्ये यूके पोलीस हल्लेखोराला अटक करताना दिसत आहेत.

मुलगी मरियमने इम्रानवर खानवर आरोप

हल्ल्यानंतर मरियमने ट्विट केले की, पीटीआयमधील जे हिंसाचार करतात किंवा कायदा हातात घेतात त्यांना अटक करावी. इम्रान खान यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पकडले पाहिजे. यापैकी कोणालाही सोडले जाऊ नये. दुसर्‍या ट्विटमध्ये, इम्रान खान आज जे काही करत आहेत ते फक्त त्याच्याविरुद्धच्या डॉजियर आणि आरोपपत्रात जोडले जातील. ही यादी लांबत चालली आहे. तो स्वतःसाठी आणि त्याच्या लोकांसाठी संकटे आणि दुःखांना आमंत्रण देत आहे.


Tags:    

Similar News