बंजारा समाजासोबत मंत्री ॲड. ठाकूर यांनी साजरे केले धुलिवंदन

पारंपरिक लोकगीतावर ताल धरत मंत्री ॲड. ठाकूर यांनी नृत्य केले, तसेच आपुलकीचा संवाद साधत सर्वांना दिल्या शुभेच्छा

Update: 2022-03-18 11:00 GMT

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज धुलिवंदनाच्या दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत, बंजारा समाजाच्या बंधु-भगिनींसोबत होळी सणाचा आनंद लुटला.




 त्यावेळी बंजारा भगिनींसह पारंपरिक लोकगीतावर ताल धरत सामूहिक नृत्य केले. बंजारा बंधु-भगिनी पारंपरिक वाद्ये घेऊन आपल्या वेशभुषेसह यावेळी सहभागी झाल्या होत्या.



तसेच यावेळी निवासस्थानी जमलेल्या सर्व बंजारा समाजातील बंधु-भगिनींसोबत आपुलकीचा संवाद साधत ॲड. ठाकूर यांनी सर्वांना मिठाई वाटप केले.




 


Tags:    

Similar News