आदित्य ठाकरेंची थेट धमकी, आत एकनाथ शिंदेंचे काय होणार?

आता घाण निघून गेली जे काही व्हायचं ते चांगलं होणार. तिकडून प्रत्येकाने एकदा राजीनामा पाठवा आणि निवडणूक लढवा आम्ही तयार आहोत असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना धमकी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेकांना वर्षा सोडता येत नाही, मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात. पण उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सहज सोडला असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली.

Update: 2022-06-26 02:41 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे प्रथमच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी थेट "घाण होती ती गेली, आता फक्त चांगलंच होणार" असं म्हणत थेट बंडखोर शिंदे गटाला धमकी दिली आहे. जे आपल्याला सोडून गेले आहेत त्यांना काय मिळणार आहे? जे आज गुवाहाटी मध्ये गेले आहेत ती आता घाण निघून गेली जे काही व्हायचं ते चांगलं होणार. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना धमकी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदार गुवाहाटी मध्ये गेले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून सरकार पडणार की टिकणार? असा प्रश्न आता सर्वांसमोर आहे. या सगळ्या प्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुरुवातीला आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र आता शिवसेनेने सुद्धा या बंडखोर आमदारांचे परतीचे दरवाजे बंद केले असल्याचे संकेत दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी काही आमदार प्राईस टॅग लावून गेले आहेत. जे गेले आहेत ते आपले नव्हते आणि कधी होणारही नाहीत. अमाप पैसा खर्च केला जातोय. ते गुवाहाटी मध्ये ज्या हॉटेल मध्ये राहिले आहेत त्या या त्या ठिकाणी दररोज त्यांच्या जेवणासाठी आठ लाख रुपये खर्च केले जात असून त्यांच्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक केल्याचे सुद्धा मी ऐकले आहे. एकीकडे आसाम मध्ये लाखो लोक पूर परिस्थितीत बुडत असताना ज्या राज्यात पूर आलेला आहे, लाखो लोक संकटात आहेत तिथे असं करायचं? आता आपल्याला लढायचं आहे असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

ज्या आमदारांनी बंड केले आहे त्यांना पक्षात परत घेतले जाणार नाही. बंडखोर आमदारांपुढे आता एकच पर्याय आहे. त्यांनी एकतर प्रहार पक्षात जा किंवा भाजप मधून जा. आता लढायला आपण तयार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार तयार असून ते जिंकायला तयार आहेत. या आमदारांनी तिकडून एकदा राजीनामा पाठवावा आणि निवडणूक लढवावी. असं म्हणत बंडखोर आमदारांचे परतीचे दरवाजे आता बंद झाले असल्याचे संकेत देखील त्यांनी आता दिले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात दिलेल्या धमकीचा अर्थ काय? शिंदे गटाच्या बंडाबाबत शिवसैनिकांची भूमिका आणि या घडामोडींचे राज्याच्या राजकारणावर होणारे परिणाम याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी कार्यकारी संपादक विलास आठवले, स्पेशल सिनियर करस्पाँडंट विजय गायकवाड, दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे आणि प्रतिनिधी शुभम पाटील यांच्याशी चर्चा केलेली चर्चा नक्की ऐका..

Full View

Tags:    

Similar News