"माझ्या शरिराचा मला अभिमान", अभिनेत्री वनिता खरातचा 'बोल्ड' अंदाज

Update: 2021-01-01 10:02 GMT

सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वनिताने न्यूड फोटोशूट करुन हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या वजनाचा कोणताही न्यूनगंड नसून आपल्याला शरिराचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. महिलांना त्यांच्या वजनावरुन आणि जाडेपणावरुन नेहमी टोमणे मारले जातात तसेच सिनेमा किंवा मालिकांमध्येही संधी दिली जात नाही. हाच विषय वनिताने या फोटोशूटमधून मांडला आहे. वनिता खरातची कबीर सिंग सिनेमामधील भूमिका गाजली आहे.

Full View
Tags:    

Similar News