जंगलातील वाट, पुराने ओसंडून वाहणारी नदी ओलांडून कर्तव्य पार पाडणारी आरोग्य सेविका

Update: 2021-06-21 07:40 GMT

मुंबई: कोरोना सारख्या महामारीत अनेक कोरोना योद्धा आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य पार पाडत आहे. यात घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेविकांच काम म्हत्वाच ठरत आहे. अशाच एका आरोग्य सेविकेच्या कामाचं देशभरातून कौतुक होत आहे. जाण्यासाठी रस्ता नसतानाही पूर आलेल्या नदीतून प्रवास करत ही आरोग्य सेविका गावा-गावात जाऊन मुलाचं लसीकरण करतेय.




जंगलातून वाट काढणारा रस्ता आणि त्यात पुराने ओसंडून वाहणारी नदी ओलांडून प्रत्येक गावात वेळेवर पोहचून मुलाचं लसीकरण करणाऱ्या झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील मानती कुमार याचं काम कौतुकास्पद आहे. घरात दीड वर्षांचा मुलगा असल्याने त्याला एकटा सोडता येत नसल्याने, त्याला पाठीवर घेऊन मानती या खडतर प्रवासातून मार्ग काढत आपलं कर्तव्य पार पाडतायत.

पती बेरोजगार असल्याने आणि आपल्या तुटपुंज्या पगारीवर घर चालवणाऱ्या मानती आरोग्य सुरक्षा सप्ताहा काळात आठवडाभर जंगलात दररोज 40 किलोमीटरचा प्रवास करून आदिवासी भागातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे या भागात एकही मुलगा लसीकरणापासून वंचित राहिला नाही.

कोरोना काळात अजूनही अनेक आदिवासी भागात आरोग्य व्यवस्था पोहचू शकली नाही. मात्र असे असताना मानती आपल्या कार्य क्षेत्रातील प्रत्येक पाड्या-वस्त्यांवर जाऊन आरोग्य सुविधा आणि माहिती पोहचवण्याच काम करतायत.




 


पतीचीही साथ...

मानती यांच्या पतींच कोरोनाकाळात रोजगार गेला असून, ते सद्या बेरोजगार आहेत. त्यामुळे तेही पत्नीच्या सोबत राहून मानती यांना सहकार्य करतात. जंगलातील प्रवास असो किंवा नदी ओलांडून दुसऱ्या गावात जाण्याची कसरत असो, ते आपल्या पत्नीसोबत असतात. तसेच त्यांच्या या प्रवासात त्यांचा दीड वर्षांचा मुलगाही असतो. आदिवासी भागातील मुलं लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानती आणि त्यांच्या पतीच्या कामाची कराल तेवढ कौतुक कमीच आहे.

Tags:    

Similar News