जमिनीच्या वादावरून दलित महिलेचं घर जाळलं; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

Update: 2021-07-10 02:10 GMT

लखनऊ: उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील बर्थरा गावात दलित समाजातील काही लोकं आणि गावातील इतर लोकांमध्ये वाद झाला. त्यानंतर गावातील इतर लोकांनी दलित वस्तीत जाऊन गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अर्धा डझन लोकांवर गुन्हे दाखल केले असून, चार लोकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कोतवाली परिसरातील बर्थरा गावात दलित आणि सवर्ण यांच्यात शेताच्या बांधावरून वाद सुरु होता.

गुरुवारी याच बांधावरून पायी जाण्याच्या मुद्यावरून वाद झाला. त्यानंतर स्वूर्ण गटाकडील काही हल्लेखोर लाठ्या-काठ्या घेऊन दलित वस्तीवर येऊन पोहचले आणि बैजंती देवी नावाच्या महिलेच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बैजंती देवी यांच्या पती आणि मुलांना बेदम मारहाण केली. तसेच हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर, पिडीतिच्या झोपडीला आग सुद्धा लावली, असल्याचा आरोप समाजववादी पार्टीचे नेते मनीष अग्रवाल यांनी केला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे.



  तसेच, अग्रवाल यांनी यावेळी भाजपवर आरोप करताना म्हंटल आहे की, 'भाजप सरकार संरक्षण देत असलेल्या गुंडांनी दलित महिलेच्या घराला आग लावली. दोन दिवसांपूर्वी अशाच गुंडांनी आजमगढ येथील दलित कुटुंबाचे घर तोडले होते. भाजप सरकारच्या काळात दलितांवर अन्याय होत असल्याचा आरोपही, अग्रवाल यांनी केला आहे.
Tags:    

Similar News