बीडच्या शिवाजीनगर पोलिसात करीना कपूर विरोधात तक्रार दाखल

Update: 2021-07-15 03:51 GMT

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या नवीन पुस्तकामुळे अडचणीत सापडली आहे. करीनाने ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र 'बायबल'चे नाव 'प्रेग्नसी बायबल' या पुस्तकावर वापरल्यामुळे करीनाविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गर्भधारणेदरम्यान जाणवलेल्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांचा खुलासा आपण आपल्या 'प्रेग्नसी बायबल' या पुस्तकातून करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून दिली होती. त्यामुळे तिच्या या पुस्तकाची मोठी चर्चा होती. मात्र आता तिच्या याच पुस्तकाच्या नावावर 'आक्षेप' घेण्यात आला आहे.

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशीष शिंदे यांनी करीनाविरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच करीनाने घोषणा केलेल्या पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणीही ख्रिश्चन महासंघाने केली आहे.

Tags:    

Similar News