- 'अशी ही बनवा बनवी' चे हे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनावर करतात 'राज'...

'अशी ही बनावा बनवी' चित्रपटातील डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर असतात. परवा या चिञपटास 33 वर्ष पूर्ण झाली. त्या निमीत्ताने शितल तारा यांनी चित्रपटातील जे गाजलेले जे डायलॉग होते त्यांचे सुलेखन ( कॅलिग्राफी) केले आहे. या भन्नाट कॅलिग्राफीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Update: 2021-09-25 14:52 GMT

जसा काळ बदलतो तशा अनेक जुन्या गोष्टी ह्या मागे पडतात. नवीन काहीतरी गोष्टी येत राहतात व जुन्या गोष्टी लोक विसरून जातात. पण अशा काही कलाकृती आहेत ज्या अनेक वर्षे लोटली तरीही लोकांच्या मनावर त्याची छाप आजही अगदी जशीच्या तशी आहे. याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे 30 वर्षापूर्वी बनवलेला 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट. 33 वर्ष्यात अनेक चित्रपट आले, गाणी आली पण ह्या चित्रपटाची जी क्रेज आहे ती तीन दशकांनंतरही कायम आहे. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. या चित्रपटातील जी विनोद शैली व यातले जे विनोदी संवाद होते ते आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहे.

या चित्रपटातील जे काही लोकप्रिय डायलॉग होते त्या डायलॉगचे शितल तारा यांनी तीस वर्षानंतर सुलेखन केला आहे. शितल तारा या सुलेखन (कॅलिग्राफी आर्टिस्ट) आहेत. कॅलिग्राफी करून त्या वेगवेगळ्या विषयांवर विनोदी व क्रिएटिव्ह पोस्ट लिहीत असतात. सध्या त्यांनी केलेल्या कॅलिग्राफीची चर्चा सर्वत्र जोरात आहे. 23 तारखेला 'अशी ही बनावा बनवी' या चिञपटास 33 वर्ष पूर्ण झाली. त्या निमीत्ताने शितल यांनी चित्रपटातील जे गाजलेले जे डायलॉग होते त्यांचे त्यांनी सुलेखन केले आहे.

हा माझा बायको पार्वती

Tags:    

Similar News