"तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही..!" हेमांगी कवी यांनी मागितली बाबासाहेबांची माफी

अभिनेत्री हेमांगी कवी यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. त्यांनी केलेल्या त्या पोस्टमधील मजकुरामुळे समाज माध्यमांवर त्यांची चर्चा आहे..

Update: 2022-04-14 08:34 GMT

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. स्वतंत्र भारताची सार्वभौम अशी राज्यघटना त्यांनी लिहिली व या घटनेच्या आधारे देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद आशा भेदभावपासून संरक्षण दिले. आशा या महामानवाला आज जयंती निमित्त जगभरातून अभिवादन केले जात आहे.

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त अभिनेत्री हेमांगी कवी यांनी एक पोस्ट शेअर करत अभिवादन केले आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी "जमलं तर आम्हाला माफ करा" असं म्हणत बाबासाहेबांची माफी मागितली आहे.

हेमांगी कवी यांनी फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हंटल आहे..

हेमांगी कवी या समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत असतात. आज देखील त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्ट मुळे चर्चेत आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटल आहे की, "मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!"




 आता या पोस्ट वर लोकांच्या काय प्रतिकिया आल्या आहेत ता देखील पाहुयात..

वैभव शिरोळे यांनी फेसबुकवर हेमांगी कवी यांच्या पोस्टवर कॉमेंट करत म्हंटल आहे की, "तू कमी पडतियेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हिमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम"




 

तर संतोष रुक्मिणी विष्णू कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणतात, "सर्व जमते पण काही राजकीय लोकांना ते नको आहे"




 विश्वेश्वर खंडाप्पा कबाडे यांनी हेमांगी कवी यांच्या या पोस्ट वर "कटू सत्य" अशी कॉमेंट केली आहे.




 

हेमांगी कवी या वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत परखडपणे व्यक्त करत असतात. समाज माध्यमांवर अशाप्रकारे परखड मत व्यक्त केल्यानंतर त्यांना अनेक वेळा नेटकर्यांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे. आज त्यांनी डॉ. बासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे.

Tags:    

Similar News