गेल्या पाच दिवसांपासून पुराच्या विळख्यात अडकलेली हजारो कुटुंबे जीव मुठीत घेऊन आला दिवस ढकलत असताना काही हजार कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांना शाळा, धर्मशाळा व अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यांच्यापर्यंत अन्न, पाणी, औषधे पुरेशी व वेळेवर मिळत नाहीत. अशावेळी अनेक हात मदतीसाठी पुढे येतात अशीच मालवाडीतील भोळे कुटुंबातील ही मायमाऊली. या मायमाऊलीची स्वतःची २ एकर जागा असून त्यातील एक एकर जागा पाण्याखाली जाऊन सुद्धा,उत्पनाची कोणतीही सोय नसून पुरात अडकलेल्या ६५ पूरग्रस्तांना जेवणाची, राहण्याची सोय त्यांनी केली. याभागात अजूनही मदत पोचली नसून याआधी त्यांनी २००५ ला आलेल्या पुरात देखील अनेक पुरग्रस्ताना मदत केली आणि आत्ताच्याही पुरात या मायमाऊलीने माणुसकीचा हात या लोकांना दिला आहे.
https://youtu.be/GTimLTqkmug