लोकसभेत महिलाराज

Update: 2019-05-24 13:27 GMT

17 व्या लोकसभेचे निकाल लागलेत. या निकालाचे विश्लेषण होत असताना एक महत्वाची बातमी समोर येतीय. या लोकसभा निवडणुकीत देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महिला खासदार निवडून आल्यात. यावेळी देशातल्या मतदारांनी 78 महिला उमेदवारांना खासदार म्हणून निवडून दिलंय.

सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी 716 महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात सर्वात जास्त उमेदवार भाजपच्या होत्या. महिला खासदारांमध्येही भाजपचाच क्रमांक पहिला लागतो. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये तृणमूस काँग्रेसच्या 9, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या आणि उडिशामध्ये बीजू जनता दलच्या प्रत्येकी पाच महिला खासदर निवडून आल्यात.

याआधी 2014 मध्ये 16 व्या लोकसभेत सर्वाधिक 62 महिला खासदार निवडून गेल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत महिला खासदार केवळ 5 टक्के होत्या. 17 व्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या 14 टक्के असणारंय.

Similar News