कोल्हापूर आणि सांगली महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हे आज पुराच्या विळख्यात आहेत. कोल्हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थितीमुले तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच स्थरातून मदतीचा ओघ सुरु असून महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध ट्रस्ट द्वारे मदत पोहचवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यातही शेतकऱ्यांप्रती तीच भावना दिसून आली आहे.
आर.आर. पाटलांप्रमाणेच मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी अन् जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुमन पाटील यांनी उपस्थित करून विधानसभा गाजवली होती. त्या तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघातून आमदार बनल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आबांप्रमाणेच त्यांच्या पत्नी सुमन पाटील त्यांचा वारसा पुढे चालवत भिलवडी-सुखवाडी येथे पुरग्रस्तांना भेटून त्यांची विचारपूस केली ,त्याचबरोबर आपत्तीची पहाणी केली. यावेळी सुमन पाटील यांनी स्वतः गावोगावी फिरत सेवा सुविधेंची सोय करून पूरग्रस्तांना भेट दिली .
अजूनही काही भागात प्रशासनाची काहीही मदत पोहचली नाहीय. अजून काही ठिकाणी पंचनामे देखील झाले नाहीत अश्या प्रतिक्रिया त्यांनी भेट दिलेल्या पूरग्रस्त नागरिकांकडून येत आहेत. पूरग्रस्तांना महाराष्ट्रातून मदत येत आहे. मात्र, ही मदत अजूनही गरजू लोकांपर्यंत पोचली नसल्याचे दिसून येते.
आजही आठवते २००५ च्या पुरावेळची आबांची कामगिरी
सत्तेच्या खुर्चीवर राहूनही आपले पाय जमिनीवर ठेवणारे आणि आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारे आबा. आर.आर.पाटील हे नाव अतिसंवेदनशील नेते आणि सातत्याने गोरगरीब जनतेला मदत करणं, गावाकडील माणसांचा विचार करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
2005 च्या पुराच्यावेळी असेच पाणी सांगलीत शिरले होते. स्वतः कमरेभर पाण्यात उभे राहून आर.आर.पाटील लोकांना बाहेर काढायचे काम करत होते. आर. आर. पाटील त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. एका गावातील 10 जणांना वाचवायला ते स्वतः रेस्क्यू टीमसोबत त्या गावी गेले होते. एक माणूस रात्रभर झाडावर बसून आहे ही माहिती मिळताच आबांनी एका माणसासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते.
"आबा असते तर ही वेळ आली नसती..."
https://youtu.be/pn1vJGliHhI