विधानपरिषदेत महिला सुरक्षेसंदर्भातील लक्षवेधीवर चर्चा

Update: 2019-12-18 12:33 GMT

सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसात संपणार आहे. आजच्या विधानपरिषदेत महिला सुरक्षेसंदर्भातील विधेयकावर चर्चा झाली . यामध्ये विधानपरिषदचे सभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केलं होत. यानंतर महिलांसाठी हेल्पलाईन म्हणून १५१२ ही भ्रमणध्वनी सुरु करण्यात आली आहे. महिलांसाठी रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात महिला प्रवासांचे प्रश्न हाताळण्यासाठी महिला पोलीस अधिकारी नेमण्यात आली आहे.

यानंतर डॉ. मनीषा कायंदे यांनी २१०५ पासून २०१९ पर्यंत महिलांवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण देशभर आहे अनेक सेवा आहेत मात्र असे प्रकार कमी होत नाहीत. काही तक्रारी पोलीस अधिकारी घेत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यामध्ये सायबर गुन्हे वाढले असून हे काम मंदगतीने होत आहे. रेल्वे पोलिस हे मोबाईलमध्ये व्यस्त असतात कारण रेल्वेमध्ये फ्री वायफाय असल्यामुळे असे दृश्य दिसून येतात. हैदराबाद प्रमाणे दिशा कायदा महाराष्ट्रात देखील लागू होण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

एकनाथ शिंदेनी देखील महिला सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारने २५१ कोटी महिलांच्या सुरक्षेसाठी दिले आहेत. फास्ट ट्रेक कोर्टात अनेक गुन्हे जात असून त्यावर योग्य ती दखल घेतली जावे. राज्य सरकारचे कर्तव्य समजून शेतकऱ्यांच्या न्यायाबरोबर महिलांच्या प्रश्नाकडे देखील लक्ष देणार आहे. सरकार आपले आहे अशीच भावना या महिलांमध्ये निर्माण झाले पाहिजे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांनवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर हैदराबाद प्रमाणे दिशा कायदा महाराष्ट्रात देखील लागू करण्याचे काम सरकार करणार आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/480587195974913/?t=1

Similar News