महिला खासदार का ट्रोल होत आहेत ?

Update: 2019-05-29 11:29 GMT

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून तृणमुल काँग्रेसच्या (टीएमसी) नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी संसद परिसरात काढलेल्या फोटोवरून त्यांना सध्या ट्रोल केलं जातय. संसदेत परिचय पत्राची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नुसरत आणि मिमी यांनी संसदेच्या आवारात फोटो काढले आणि फोटो स्वत:च्या सोशल हँडल्सवरून शेअर केले. या फोटोंमध्ये नुसरत आणि मिमी यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल केलं जातय.

[gallery columns="1" data-size="medium" link="none" ids="2987,2988,2989,2990"]

या दोन्ही महिला खासदारांवर टीका भाजपशी संबंधित व्यक्तींकडून तसंच सर्वसामान्य माणसांकडूनही होत आहेत. काहीतरी लाज बाळगा. अशा बाईला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं आहे".

फॉर्मल कपडे परिधान करायला सुरुवात करा. तुम्ही भारतीय कपडे घालणं आवश्यक आहे. तुम्ही संसदेत जात आहात, चित्रपटाच्या प्रमोशनला नाही. संसदेच्या प्रांगणात कसे कपडे घालावेत याचं भान तुम्हाला हवं. ही शूटिंगची जागा आहे. अशा वाईट पध्द्तीने या दोन्ही महिला खासदारांना ट्रोल करण्यात आलंय.

तर काही लोकांनी मात्र या दोघींना पाठिंबा देताना ट्रोल्सला प्रत्युत्तर दिलं आहे. कमेंट लिहिणाऱ्यांनो, महिला खासदारांना त्यांना जे कपडे परिधान करायचे आहेत ते करू द्या. तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासंदर्भात जागरूक राहा. त्यांचे कपडे हा चर्चेचा विषय असायला नको."

अशा शब्दातही सुनावलंय.

Similar News