त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Update: 2019-03-15 09:45 GMT

चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ... गर्दीचं वातावरण... अशातचं काळाचा पूल कोसळणे... आणि ६ जणांचा दुर्देवी मृत्यू...अनेक जण जखमी... या दुर्घटनेमुळे अनेकांची तारांबळ उडाली.

मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ असणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. संध्याकाळच्या सुमारास हा ब्रीज कोसळला. या ब्रीज दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झालाय. मुख्य म्हणजे या दोन्ही महिला जीटी म्हणजेच गोकूळदास तेजपाल रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. तर एक महिला सेंट जॉर्ज रूग्णालयातील परिचारिका होत्या.

या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे आणि या तिन्ही महिला रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तिन्ही परिचारिकांची नावं आहेत. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या दोन्ही परिचारिका गोकूळदास तेजपाल रूग्णालयात कार्यरत होत्या. तर भक्ती शिंदे या सेंट जॉर्ज रूग्णालयात कार्यरत होत्या. 2 परिचारिकांची नाईट शिफ्ट होती आणि त्या रूग्णालयात कामावर येत होत्या”. “अपूर्वा प्रभू या ओटी विभागात तर रंजना तांबे ऑर्थो विभागात कार्यरत होत्या. दोघी रात्रपाळीसाठी कामाला येत होत्या. त्यावेळी ही घटना घडली”

एवढी मोठी दुर्घटना घडली मात्र याची जबाबदारी कोणी घेण्यास तयार नाही.. मग या मृत्यूला जबाबादार नेमकं कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.

Similar News