काँग्रेसला सोशल मीडियावर पुनरुज्जीवीत करणाऱ्या दिव्या स्पंदना आहेत तरी कोण?

Update: 2019-06-03 10:55 GMT

राजकारणात प्रवेश

दिव्या स्पंदना यांचा प्रवासही अभिनेत्री ते नेता असा झालाय. 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटकातल्या मंड्या लोकसभा मतदारसंघात 2013 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या. मात्र, 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागू शकला नाही आणि त्या पराभूत झाल्या.

फिल्मी करिअर

स्पंदना यांनी कन्नड सिनेमांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2003 मध्ये आलेला ‘अभी’ त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी तामिळ आणि तेलूगू चित्रपटांमध्येही आपलं अभिनय कौशल्य दाखवलंय. रम्या त्यांचं पडद्यावरचं नाव आहे मात्र, आता त्यांना या नावानंही ओळखलं जातं. अभिनयासाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कारही मिळालेत.

सोशल मीडियावर काँग्रेसला ‘पुनरुज्जीवीत’ करण्यात महत्वाची भूमिका

ऑगस्ट 2017 मध्ये दिव्या यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनीही हे आव्हान पेलत काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची पुनर्बांधणी केली. फेसबुक, ट्विटवर अनेक कॅम्पेन्स राबवल्या. प्रसारमाध्यमांना काँग्रेसच्या कामाची दखल घेण्यास भाग पाडलं.

राहुल गांधी यांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यामध्येही दिव्या यांची महत्वाची भूमिका आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांपासून राहुल गांधींचं आक्रमक होणं, सोशल मीडियावर व्यक्त होणं यामागे दिव्या यांची रणनिती आहे असं सांगितलं जातं.

Similar News