घरातील महिलांच्या मतांवर कुणाचा ताबा?

Update: 2019-05-02 07:39 GMT

2019च्या लोकसभा निवडणुका सुरु आहेत. 11 एप्रिल पासून 19 मे पर्यंत सात टप्प्यात या निवडणुका होत आहेत. निवडणुकांचा हंगाम म्हटलं की बाहेरच्या हवेत उन्हाच्या झळांसोबतच पक्षांच्या प्रचाराची गरमागरमी सुरु असते. बाहेरील वातावरण जरी तापलेलं असलं तरी प्रत्येकाच्या घरा-घरात अशावेळी नेमकं काय सुरु असतं. माहित आहे का तुम्हाला...

लोकशाहीच्या उत्सवात 18 वर्षावरील महिला-पुरुष मतदारांना संविधानाने स्वतंत्रपणे मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र या हक्काची अंमलबजावणी कशी होते. हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मी यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक घरातील महिला मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये असं आढळलं की घरातील महिला मतदारांना त्यांचा मुलगा, नवरा, वडील सांगत असतात की अमूक-अमूक पक्षाला मत दे म्हणून... हे धक्कादायक जरी असलं तरी हे तुमच्या-आमच्या घरात नक्की होत असावं मात्र याची वाच्यता कुठेही होत ऩाही. बरं मगं आता याची वाच्यता जरी झाली तरी का बरं असं घडत असेल याचा विचार केला तर ही कारणं समोर आली.

पुरुषमंडळींना राजकारणात खूप रस असतो हे आपण नेहमीच पाहतो मात्र ज्या महिला या सगळ्यांपासून वंचित आहे ज्यांना राजकीय पक्षांसर्दभात फारसी काही माहिती नाही अशा महिलांना कुणीतरी सांगतिलं जातं तेव्हा त्या मतदान करतात.

तर दुसरीकडे ज्या महिलांना राजकारणाची उत्तम जाण असूनही त्यांच्यावर घरातील मोठ्या मंडळींकडून दबाव असतो की अमूक पक्षालाच मतदान करा. हे पूर्वीपासून चालत आलंय. मात्र यावर कधी वाच्यता झाली नसावी. नवरा,भाऊ, वडील, मुलगा सांगतोय म्हणून मतदान करायचे यात मला असं वाटतं की महिलांच्या स्वतंत्र अधिकारावर या मंडळींनी ताबा मिळवला आहे आणि वर्षानुवर्षे हेच चालणार. यामध्ये महिला कुठेतरी राजकारण समजून घ्यायला मागे पडतात का हा प्रश्न उपस्थित होतो. विशेषतः घरातील महिलांनी राजकीय पक्षाबद्दल आपलं मत तयार करणं गरजेचं आहे. तसेच ही सगळी परिस्थिती एका बाजूला असली तरी याची दुसरी बाजू अशी की बऱ्यापैकी महिला स्वतःचे अधिकार समजून निवडणुकांसंदर्भात आपलं मत तयार करु लागल्यात. राजकारणातही बऱ्याच महिलांचा सहभाग वाढत आहे.

प्रियंका आव्हाड

Similar News