पंकजा मुंडे यांचा सत्ता स्थापनेकडे काना डोळा

Update: 2019-11-08 14:03 GMT

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. आणि या निवडणुकीत शेवटी धनंजय मुंडे यांनी बाजी मारली.

मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपला पराभव स्विकारला होता.

मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा. कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबासमवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच, तो अंतिम असतो बस्स!! ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!! मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा." या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं.

असं म्हणत त्यांनी पराभव स्विकारला होता. त्यानंतर त्या माध्यमांवरती फारशा दिसल्या नाही. मात्र, मध्यंतरी भाजपच्या कोअर कमीटीच्या झालेल्या बैठकीत त्या उपस्थित होत्या.

निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी झालेल्या हालचाली मध्ये मात्र, त्या कुठेही दिसल्या नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या या घडामोडींमध्ये त्या कुठेही दिसल्या नाही. असंच दिसून येतं.

Similar News