काय आहे #MeToo चळवळ?

Update: 2019-06-14 10:48 GMT

#Metoo या मोहिमेदरम्यान ज्या स्त्रियांसोबत लैंगिक शोषण झाले आहे. त्या स्त्रिया #मीटूमुळे जगासमोर व्यक्त होत आहेत. याआधी स्त्रियांना समाजासमोर व्यक्त होता येत नव्हते. परंतु #Metooया मोहिमेमुळे स्त्रिया व्यक्त होत आहेत.

#Metoo या मोहिमेची अशी झाली सुरुवात

#Metoo या शब्दाचा उल्लेख अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या तारना बुर्क यांनी केला होता. लैंगिक शोषण झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी ही मोहीम सुरु केली होती. तेव्हा एका तेरा वर्षाच्या मुलीसोबत बोलत असताना त्यांना कळाले, की त्या मुलींवर लैंगिक शोषण झाले आहे. बुर्क यांनी मायस्केप सोशल साईटवर #Metoo ला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हॉलिवूड मधली अभिनेत्री अलिसा मिलानो हिने #Metoo हि मोहीम ट्विटरद्वारे जगभर पसरवली. या मोहिमेला खूप स्त्रियांनी प्रतिसाद दिला आहे.

Similar News