शेतकऱ्यांचा आवाज-पूजा मोरे

Update: 2019-10-31 16:11 GMT

स्वाभिमानी पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे (Pooja More) यांनी बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील जातेगावात आणि माजलगाव तालुक्यातील टाकरवाडी या गावात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांचे दुःख जाणुन घेत शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर पाहणी केली.

मराठवाड्यात पावसाची कमतरता असते. परंतू यंदाच्या वेळी पेरणी नंतर पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग खुश झाला होता. परंतु पावसाने सर्व मर्यादा ओलांडल्या. खरीप पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटून गेला.

यासंदर्भात, “सरकारने पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी तसेच, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना जाचक अटी न लागू करता पिक विम्याचे पैसे दिले पाहीजे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे पिका विमा भरला नाही. त्यांना १ लाख रूपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी असे आवाहन पुजा मोरे यांनी सरकारली केलं आहे. तसेच तकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अन्यथा स्वाभिमानी पक्ष ताकदीने आंदोलन करील अशा भाषेत त्यांनी सरकारला खडसावले आहे.

Similar News