यंदाच्या निवडणुकांत वैशाली येडे मारणार बाजी ?

Update: 2019-04-11 07:14 GMT

आज २०१९ लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून विर्दभातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील परिस्थतीचा आढावा घेऊयात. या मतदारसंघात प्रस्थापित उमेद्वारांपुढे प्रहार च्या वैशाली येडे या सर्वसामान्य उमेदवाराने आव्हान निर्माण केले आहे. आमदार बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यानंतर त्यांच्या प्रचारनिधी साठी मदतीची झोळी मतदारसंघात फिरवली आहे. शिवाय सोशल मीडियावरूनही मदतीचे आवाहन केल्या गेल्याने १० लाख रुपयांवर मदत निधी गोळा झाला. वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि दारूबंदी असे प्रचाराचे मुद्दे उपस्थित केल्याने त्यांना त्यांच्या प्रचारसभांना गर्दी होताना दिसून आली. शिवाय राज्यभरातून प्रहार चे कार्यकर्ते प्रचाराच्या नियोजनासाठी मतदारसंघात सक्रिय झाले होते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे या उमेदवार असल्याने सहानुभूती म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. त्यामुळे मात्र धनाढ्य प्रस्थापित उमेदवारांची चांगलीच भांबेरी उडाली आहे. यवतमाळ वाशिम मधून शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी पाचव्यांदा नशीब आजमावत असून काँग्रेस ने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर पीबी आडे यांनी भाजपासोबत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. बंजारा समाजाचे बहुमत असल्याच्या अविर्भावात त्यांनी थेट युतिलाच निशाणा केला.

Similar News