उंच भरारी घेण्याची उर्मी रक्तात असावी लागते. शर्विका म्हात्रे वय 2.5 वर्षे. या चिमुरडीने आपल्या आई वडिलांसोबत चालत प्रबळगडचा ‘कलावंतीणी’चा अवघड सुळका पार केला आहे. शर्विका जेव्हा सुळका सर करत होती. तेव्हा तिच्याकडं पाहून थकलेले पर्यटक स्वत: चालण्याचा प्रयत्न करत होते.
इतका अवघड सुळका सर केल्यानंतर शर्विकाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. शर्विका अलिबागमधील लोणारे गावात राहते. विशेष बाब म्हणजे शार्विकाने 26 जानेवारीला या सुळक्यावर तिरंगा ध्वज फडकावला.
कलावंतीण सुळका हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायर्यावरुन हा सुळका सर करावा लागतो. कर्जत माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे. हा किल्ला चढण्यासाठी साधारण तीन तासाचा वेळ लागतो. आणि त्यापुढे कलावंतीण सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात.
शर्विका ने ‘कलावंतीणी’चा हा सुळका सर केला आहे. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,शर्विकाने अवघ्या अडीच वर्षात 11 किल्ले सर केले आहेत. त्यामुळे भविष्य शर्विकाचं भविष्य उज्ज्वल आहे.