आदिवासी महिलांना आता बस चालवण्याची संधी मिळणार.

Update: 2019-08-26 15:14 GMT

घर आणि मूलं सांभाळून आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून अनेक महिला नोकरीसाठी घराबाहेर पडतात. सरकारी योजनेमधून देखील अनेक गरीब महीलांनी नोकरी करून आपले संसार फुलवले आहेत. आज पर्यंत आपण बसमध्ये महीलानां कंडक्टर म्हणून पाहील असेल परंतू आता आदिवासी महीलांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सरकारने आदिवासी महिलांची बस चालक म्हणून निवड करणार आहे.

शुक्रवारी माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महिलांना बस चालक प्रशिक्षण आणि नोकरी देणाऱ्या महामंडळाच्या मपुढाकाराचे उद्घाटन करण्यात आले. या पायलट प्रोजेक्टसाठी गडचिरोली, वर्धा, भानदारा आणि गोंदीया जिल्ह्यातील 163 महिलांची निवड करण्यात आली आहे. या महिलांना बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणी त्यानंतर त्यांना ड्रायव्हरपदी नियुक्त केले जाईल. त्याचबरोबरीने सरकार महिला चालकांच्या सुरक्षेवर देखील भर टाकणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे.

‘महीलांना शिक्षण देऊन आणि त्यांचा विकास करून देश पुढे जाईल, आदीवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.’ असे भाष्य या कार्यक्रमा दरम्यान माझी राष्ट्रपती प्रतीभाताई यांनी केले. महाराष्ट्रात यापुर्वी असा उपक्रम राबण्यात आला नाही. त्यामुळे दोन-तीन चाकी नंतर महीला आता चार चाकी वर कंट्रोल करणार आहेत.

Similar News