हे आहेत पी व्ही सिंधूचे पाच पराक्रम.

Update: 2019-08-26 15:42 GMT

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासीक कामगीरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही सिंधूने सगळ्या भारतीयांच्या मनात घर केले आहे. आजपर्यंत भारतात कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूं ने इथपर्यंत मजल मारली नव्हती परंतू सिंधूने जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत महीला एकीरीच्या अंतिम लढतीत जपानच्या नेझोमी ओकुहारचा 21-7 21-7 असा पराभव केला.

सिंधूने यंदा सईद मोदी चषक, कोरियन खुली स्पर्धा या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवले. कोरियन स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याची ऐतिहासिक कामगिरी तिने केली. जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सध्या तिचे स्थान आहे

जागतिक स्तरावर मक्तेदारी गाजवण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता सिंधूकडे आहे. जवळजवळ सहा फूट उंची तिला लाभली असल्यामुळे बॅडमिंटनच्या मैदानावर चतुरस्र खेळू शकते. यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंनी टाकलेल्या खोलवर सव्‍‌र्हिस, ड्रॉपशॉट्स, परतीचे फटके सहजपणे परतवण्यात तिला अडचण येत नाही. यंदा तिने आतापर्यंत वैयक्तिक स्पर्धामध्ये ५० सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यांपैकी ४० सामन्यांमध्ये तिने विजय मिळवला आहे.

भारताने आत्तापर्यंत जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत 3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकून 9 पदकांची कमाई केली आहे यातील 2 रौप्य आणि 2 कांस्य हि सिंधूने जिंकलेली आहेत. यातील 2013 व 2014 ला कांस्यपदक तर 2017 व 2018 ला रौप्यपदक पटकावले

Similar News