बेरोजगार इंजिनिअर झाली थेट खासदार

Update: 2019-05-28 06:51 GMT

चंद्राणी मुर्मू... इंजिनिअर झाली... नोकरीच्या शोधात वणवण भटकत होती. काम काही मिळत नव्हतं. मात्र नियतीचा असा काही फेरा उलटला आणि होत्याच नव्हतं झालं. तिला चक्क खासदारकीची लॉटरी लागली. ओडिशातील चंद्राणी मुर्मू हिला बिजू जनता दलानं (बिजेडी) तिकीट दिलं आणि ती निवडून आली. आणि देशातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही तिनं मिळवलाय.

चंद्राणी ही २५ वर्षांची असून तिने ओडिशातून इंजिनिअरची पदवी घेतली आहे. ओडिशाची क्योंझर लोकसभा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. या मतदारसंघात तिने भाजपच्या अनंत नायक यांचा ६७ हजाराहून अधिक मतांनी पराभव केलाय.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंद्राणीने नोकरीच्या शोधात फिरत होती. पण हाती काही लागत नव्हतं. स्पर्धा परिक्षांमध्येही तिने नशीब आजमावून पाहिलं पण त्यातही तिच्या हाती अपयश आलं. त्याचवेळी नोकरीचा शोध सुरू असतांनाच तिला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आणि खासदार म्हणूनही ती निवडूनही आली. निवडून आल्यानंतर चंद्राणी यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यावर प्रामुख्याने भर देणार असल्याचं सांगितलं.

Similar News