सरकारने कामांना स्थगिती न देता, नवीन योजना राबवाव्यात – मोनिका राजाळे

Update: 2019-12-22 09:49 GMT

नागपुर हिवाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. २ लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी, १० रुपयात थाळी असे महत्वपुर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेत. त्याचबरोबर अनेक कामांना अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.मॅक्स वुमन’शी बोलताना आमदार मोनिका राजाळे म्हणाल्यात “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात यशस्वी योजना होत्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि जलयुक्त शिवार योजना या योजना अंतर्गत शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला मिळालेल्या निधीतून अनेक विकास कामे केलीत.”

विधानसभेत अनेक कामांना स्थगिती दिल्यामुळे आमदारांनी या निर्णया विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शेवगाव पाथर्डी मतदार संघात जवळपास १५० किलो मिटरच्या रस्त्यांची कामं झाली असून काही रस्त्यांच काम अजूनही प्रंलबीत आहे. या कामांना स्थगिती न देता चालू ठेवली पाहीजेत आणि त्याचबरोबर, नवीन योजना राबव्याव्यात असं मत आमदार मोनिका राजाळे यांनी व्यक्त केलं.

शेवगाव पाथर्डी मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्याप्रमाणात डॉक्टरांची कमतरता पाहायला मिळतेय. शेतकरी, ऊसतोड कामगार ग्रामीण भागातून येणारे गोर-गरीब प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. परंतू डॉक्टर नसल्यामुळे या लोकांना परत फिरावं लागते हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. हेच मुद्दे मी अधिवेशनात मांडले. जिल्हा परिषद इमारतीसाठी पहिले मोठ्याप्रमाणात निधी मिळायचा तो आता कमी होत गेला आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी १५० खोल्यांची गरज आहे. परंतू यासाठी तुटपुंजी निधी मिळत असल्याची खंत आमदार मोनिका राजाळे यांनी यावेळी स्पष्ट केली.

Similar News