तीन तलाक कायद्याचा पहिला बळी.

Update: 2019-08-26 15:29 GMT

तीन तलाक हा कायदा रद्द केल्यानंतर अनेक मुस्लिम समाजाच्या दुर्दैवी तीन तलाक पिडीत महिलांचा मोडकळीस आलेला संसार सावरला असे आपण गृहीत धरले परंतू हा कायदा महिलांच्या हिताचा आहे की नाही याचा विचार कोणी केला आहे का?

उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात तिन तलाक देऊ न शकणाऱ्या नवऱ्याने त्याच्या 22 वर्षीय पत्नीला जीवंत जाळून तिचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. या इसमाने याआधी फोनवरून तीन तलाक दिला. यानंतर पिडीत महिला या घटने ची तक्रार करण्यासाठी पोलीसात पोहचली, तेव्हा नवीन कायद्याचा संदर्भ देत त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. पण तिच्या नवऱ्याने चिडून त्यांच्या वर्षाच्या मुलीसमोर तीला जाळून टाकले. मुलीने संपूर्ण घटनेची माहिती पोलीसांना दिली आहे. सध्या पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

Similar News