हे आहेत पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे

Update: 2019-12-12 11:03 GMT

गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त यावेळी भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, महादेव जानकर, सुरेश धस, पाशा पटेल, बबनराव लोणकर, अतुल सावे, हरीभाऊ राठोड, सूरजीतसिंह राठोड, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित होते.

 

मी पक्ष सोडणार नसून पक्षाला मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा.

मी कुठेही जाऊन काहीही होऊ शकले असते, पण मला ते शोभणारं नाही.

जर पदाच्या हव्यासावरुन आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून राजीनामा देते

कोणी म्हणाले की पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.

तुम्ही मला वाघीण म्हटलं की विरोधकांच्या पोटात दुखतं, आता तरी मी आमदारही उरले नाही.

सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी 27 जानेवारीला औरंगाबादेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यानंतरही एक-एक आमदार जोडण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते, आणि तुम्ही म्हणता मी बंड करणार, कोणाविरोधात? माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत.

Similar News