मलाला गप्प का? तस्लीमा नसरीन यांचा सवाल

Update: 2019-04-05 05:25 GMT

पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल नोबल विजेती कार्यकर्ता मलाला गप्प का? असा सवाल लेखिका तस्लीमा नसरीन यांनी विचारला आहे. तिच्या देशातल्या हिंदू मुलींबद्दल मलाला ने बोललं पाहिजे. हिंदू मुलींचं अपहरण होतंय, त्यांच्यावर बलात्कार होतायत, तसंच त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं जातंय. जागतिक नेत्यांनी तिचं ऐकलं पाहिजे, तिला वाटलं तर ती पाकिस्तानमधल्या अल्पसंख्यांक महिलांची दुःख कमी करू शकते. मला समजत नाहीय, मलाला या संपूर्ण प्रकरणाबाबत शांत का आहे, असं मत तस्लीमा नसरीन यांनी व्यक्त केलं आहे.

Similar News