SSC Result 2019; यंदाही मुलींनी मारली बाजी

Update: 2019-06-08 07:37 GMT

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७. २७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2254758437971455/

निकालासाठीची संकेतस्थळे

maharashtraeducation.com

mahresult.nic.in

mahahsscboard.maharashtra.gov.in.

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.

 

Similar News