या आईला जगभरातून होतोय सलाम

Update: 2019-12-11 10:22 GMT

स्त्री म्हटली की तिला अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. मात्र काही महिला आपल्या कामाशी कटीबद्ध असतात. हा कटीबद्धपणा मिझोरामच्या लाल्वेंतलुआंगी या व्हॉलीबॉलपटूनं मॅच ब्रेकदरम्यान पहायला मिळाला. आपल्या सात महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असतानाचा हा फोटो वायरल होत आहे. आयझोलमध्ये मिझोराम राज्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ती आपल्या सात महिन्यांच्या बाळालाही सोबत घेऊन आली होती. ब्रेकदरम्यान तिनं आपल्या बाळाला स्तनपान केलं. हा फोटो पाहिल्यानंतर या 'सुपरवुमन'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काहींनी तिला सुपरवुमन आणि सुपरमॉम अशी उपाधी दिली.

Similar News