हवालदाराची पोर झाली की UPSC परिक्षेत पास

Update: 2019-04-06 12:53 GMT

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे निकाल जाहीर झाले असून यातही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळतेय. तसेच सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा हा भाग पर्जन्य छायेत येणारा आणि कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने इथली माणसं नोकरी मिळवण्यासाठी मुंबई-पुणे येथे स्थलांतरित होतात. अशाच पैकी पोलीस दलात हवालदार म्हणून काम करणाऱ्या नानासाहेब धायगुडे यांची कन्या स्नेहल हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यादीत १०८ वा क्रमांक मिळवून त्यांचच नाहीतर अख्या समाजाचं नाव रोशन केलं आहे.

दरम्यान तिच्या या यशाचे सगळ्यांनी कौतुक करत म्हटलं आहे तू मिळवलेलं हे बावनकशी सोनं आहे. तमाम समाज बांधव तुझ्या या यशाने आनंदित झालं आहे. तुझ्यामुळे शिकणाऱ्या मुलांना नक्की प्रेरणा मिळेल. तसेच बारा धायगुडे वाड्या आनंदात न्हाउन निघाल्यात... तू आपल्या कार्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन घडवून आणशील तुझ्या उज्जवल भवितव्यासाठी शुभेच्छा

Similar News