शपथविधी सोहळ्यात आशा भोसलेंच्या मदतीला आल्या स्मृती इराणी

Update: 2019-05-31 11:59 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातून पाहुणे दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात दाखल झाले होते. सुमारे ७ हजार पाहुणे या सोहळ्याला येतील, अशी तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.

शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती. नेमकं याच गर्दीत आशा भोसले (Asha Bhosle) अडकल्या होत्या. या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी आशा भोसलेंनी अनेकांना मदत मागितली, मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) तिथं आल्या आणि त्यांनी आशा भोसले यांना गर्दीतून बाहेर येण्यास मदत केली. यासंदर्भातलं ट्विट स्वतः आशा भोसलेंनी करत स्मृती इराणी यांच्यासोबतचा फोटोही शेअर केलाय.

स्मृती यांनी केलेल्या मदतीमुळे मी सुखरुपपणे घरी पोहचू शकली. दुसऱ्यांना मदत करणे, त्यांची काळजी घेणे या भावना स्मृती यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळेचे त्या निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाल्या आहेत, असं अशा भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

 

 

Similar News