फडणवीसांना शिवसैनिक महिलांचा अनोखा आहेर!

Update: 2020-02-27 12:21 GMT

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बीड मधील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला साडी चोळीचा आहेर करत त्या वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आलाय. फडणवीस यांनी महिलांचा अनादर केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात त्यांनी माफी मागावी. अन्यथा विधान भवनात साडीचोळी भेट देऊ असा इशारा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. दरम्यान फडणवीस यांच्या प्रतिमेला साडीचोळी, हिरवा चुडा, नेल पॉलिश, लिपस्टिक आणि चपलेचा आहेर देत फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर शिवसेना शांत आहे. त्यांनी बांगड्या भरल्या आहेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याचा शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. ‘सहसा मी तुम्हाला उत्तर न देणं पसंत करतो. तुम्ही बांगड्यांवरच्या वक्तव्याबाबत माफी मागितली पाहिजे. बांगड्या सर्वात शक्तीशाली महिला परिधान करतात. राजकारण सुरू राहील पण दृष्टीकोन बदलला पाहिजे. एका माजी मुख्यमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणं लज्जास्पद आहे’ असं आदित्य यांनी ट्विट केलं होत. यावर आता शिवसेना महिला आघाडीच्या कार्यक्रत्याही झाल्यात.

 

Similar News