शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदिश्रीने लोकसभा पाहण्याचा हट्ट धरला आणि हा हट्ट तिचे बाबा म्हणजेच खासदार धैर्यशील माने यांनी पूर्ण केला. देशातील सर्वच पक्षाचे दिग्गज नेते संसदेच्या सेंटर हॉलमध्ये असतात. या सहा वर्षाच्या मुलीने संसदेतील बड्या नेत्यांना भेटायचंय असा हट्ट धरला. या सर्व नेत्यांशी तिने भेटी घेतल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या,त्यांची विचारपूस केली आणि या सर्वांबरोबर फोटो काढण्याचा हट्ट देखील धरला. शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रस अध्यक्षा,सोनिया गांधी, प्रफुल्ल पटेल, स्मृती इराणी, रामदासजी आठवले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नवनीत राणा, खासदार अगाथा संगमा यांसह इतरांसोबतही आदिश्रीने फोटो काढले. हे सर्व फोटो धैर्यशील मानेंनी स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आदिश्रीची दिल्ली वारी! असे कॅप्शनही त्यांनी या पोस्टला दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्यासोबत धैर्यशील माने यांची लेक आदिश्रीने फोटो काढला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसोबतही तिने यावेळी चर्चा केली.
राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा
खासदार जया बच्चन यांच्याकडून आदिश्रीने ऑटोग्राफही घेतला.